लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर वन परिक्षेत्रातील सावरखेड, जिराईत पातूर येथे गतवर्षी लावलेल्या २५,३५० पैकी वाचलेल्या २०,२८० झाडांचा वाढदिवस बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार तथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ जुलै रोजी जंगलात केक कापून अभिनव पद्धतीने साजरा केला.गतवर्षी साखरखेड येथील लावलेली ९२ टक्के, जिराईत रोपवन ८० टक्के रोपे वर्षभरानंतर जिवंत आहेत. या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याच्या अभिनव संकल्पनेंतर्गत सावरखेड येथे रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात वन परिक्षेत्र अधिकारी जी.डी. देशमुख, चरणसिंग राठोड, दीपक धाडसे, सावरखेड वन समिती अध्यक्ष धंदरे, सरपंच, शिक्षक, वनपाल, सियाते, वनरक्षक बेले, डाखोरे, ठाकरे,तलाठी नंदकिशोर जाने, गोपाल राऊत यांची उपस्थिती होती. जिराईत रोपवन क्षेत्रावर आयोजित या वृक्षांच्या वाढदिवस कार्यक्रमाला पातूरच्या नगराध्यक्ष कोथळकर, वनपाल वाघ, वनरक्षक रंजवे, डोखोरे, राजेश इनामदार आदीची उपस्थिती होती.यावेळी आमदार बळीराम सिरस्कार म्हणाले, की वृक्षारोपण सर्वच करतात; मात्र झाड जगवून वाढदिवस करण्याचा आदर्श उदाहरण पातूर वन परिक्षेत्राचे आहे. तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी यांच्या हस्ते केक कापून साजरा केला.
सावरखेड येथे वृक्षांचा वाढदिवस!
By admin | Published: July 03, 2017 1:29 AM