गांधी चाैकात ऑटाेचालकांची मनमानी
अकाेला : शहरातील ऑटाेचालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गांधी चाैकात पाेलिसांच्या नाकावर टिच्चून ऑटाेचालक प्रवाशांसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी वाहतुकीची काेंडी निर्माण हाेत असली तरी वाहतूक पाेलिसांकडून काेणतीही कारवाई केली जात नाही.
पाणीपुरवठा विस्कळीत
अकाेला : शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महानजी प्लाॅटमधील जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीवर इतर जलवाहिनीच्या जाेडणीचे काम केले जात आहे. त्या आनुषंगाने पूर्व झाेनमधील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारपासून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे.
खुले नाट्यगृह ते फतेह रस्त्यावर काेंडी
अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकापर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लॅस्टिक विक्रेत्यांसह फळविक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. रविवारी गर्दीमुळे या रस्त्यावर वाहतुकीची काेंडी झाल्याचे दिसून आले आहे.
बसस्थानकालगतचा खड्डा ठरताेय जीवघेणा
अकाेला : मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. याठिकाणी भूमिगत नालीचे बांधकाम केले जाणार हाेते. सदर काम अर्धवट असून, हा खड्डा कायम असल्यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी तसेच शहरातील वाहनचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद
अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैक ते बाळापुर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील एलइडी पथदिवे मागील चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेत असले तरी बांधकाम झालेल्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे.
व्हाॅल्व्ह नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय
अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
जलकुंभ परिसरात साचले पाणी
अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक व जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.