अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी शेतकरी जागर मंचाने सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून, या आंदोलनाअंतर्गत जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतल्या नंतर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आंदोलकांना भेट देऊन त्यांचे म्हणने ऐकुन घेतले. या बोलणीदरम्यान आंदोलकांचे समाधान झाले नाही. पुढील एक तासात प्रशासनाने शेतकºयांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर शेतकरी काहीही करण्यास मोकळे आहेत, असा ‘अल्टिमेटम’ यशवंत सिन्हा यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना दिला होता. तासाभरात प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांना भेटण्याची गळ घातली; परंतु जिल्हाधिकाºयांनी भेटण्यास मनाई केली. त्यानंतर पोलिसांनी यशवंत सिन्हा, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे यांच्यासह आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
शेतकऱ्यांसाठी आंदोलन: भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक
By atul.jaiswal | Published: December 04, 2017 5:43 PM
अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला होता ठिय्यारविकांत तुपकर व शेकडो शेतकºयांनाही घेतले ताब्यात