अकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बेकायदेशीररीत्या कारवाई करत अटक केली. त्या अटकेचा व राज्यातील आघाडी सरकारचा अकोट भाजपने तीव्र निषेध व्यक्त करून उपविभागीय कार्यालयात ठिय्या दिला. तसेच राणे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांमार्फत राज्यपालांना देण्यात आले. या निवेदनावर नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे, शहर अध्यक्ष कनक कोटक, अशोक गावंडे, राजेश नागमते, राजेश रावणकर, अब्ररारभाई, मंगेश चिखले, मंगेश लोणकर, हरिष टावरी, कुसुमताई भगत, प्रकाश आतकड, मधुकर बोडखे, राजेश चंदन, योगेश नाठे, मंगेश पटके, जितू जेसवाणी, नितीन टोलमारे, जलीलभाई, मनोज चंदन, चंचल पितांबरवाले, रवींद्र केवटी, रामदास भेंडे, अर्जुनसिंग सोळंके, गोपाल रावणकर, राजेंद्र मावलकर, मुस्ताक पटेल, नीलेश नवघरे, रवींद्र वालसिंगे, राजेंद्र पोटे, प्रकाश जवंजाळ, श्रीकृष्ण ढोक, इक्बाल इनामदार, राजू येऊल, ज्ञानेश्वर आढे, नितेश तायडे, विशाल ठोसर, शंतनु चरपे, राधेश्याम ताडे, ओमप्रकाश शेंडे, अनिल गुजर, विनोद इसेकर, श्याम गावंडे, श्रीकृष्ण तेलगोटे, पीयूष बिजने, देवीदास जायले, विशाल आवटे, राधेश्याम यावलकर, मारोती शिवरकर, अ. शाहरुक, अक्षय भगत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
भाजपतर्फे केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:22 AM