अकोला : युती तुटल्याची घोषणा भाजपने केल्यानंतर, अध्र्या तासातच राष्ट्रवादी कॉँग्रेसही आघाडीतून बाहेर पडली. भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षांची छुपी युती असल्याचा आरोप कॉँग्रेसचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी मंगळवारी अकोल्यातील जाहीर सभेत केला. भाजपने कॉँग्रेसवर महागाई, भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र, मोदी सरकारमधील नितीन गडकरी, उमा भारती, रामविलास पासवान यांच्यासह ८ मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. मोदी सरकारने महागाई, महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी कोणते उपाय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानकडून होणार्या गोळीबारात भारतीय जवान शहीद होत असतानाही पंतप्रधान गप्प का, असा सवालही त्यांनी केला. याप्रसंगी व्यासपीठावर अकोला पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवार उषा विरक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष मदन भरगड, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, बबनराव चौधरी, रमाकांत खेतान, नितीन ताकवाले, स्वाती देशमुख, अविनाश देशमुख, क िपल रावदेव, अनंत बगाडे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाजप-राकॉँची छुपी युती
By admin | Published: October 08, 2014 12:59 AM