अकोला: आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्दबातल केले. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देइपर्यंत भाजपचा लढा सुरू राहणार असून यानंतर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. शनिवारी सकाळी शिवर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भाजपच्यावतीने रास्ता राेकार करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. रास्ता राेेकाेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. यावेळी पाेलिसांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ताब्यात घेतले.सर्वाेच्च न्यायालयात याेग्य भूमिका मांडण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्यामुळेच न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले. अशास्थितीत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदाेलनाचा बिगुल फुंकण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या आदेशानुसार शनिवारी जिल्हाभरात ओबीसी समाजाच्या समर्थनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. यावेळी आ.गाेवर्धन शर्मा, तेजराव थाेरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापाैर अर्चना मसने, राहुल इंगळे, श्रावण इंगळे, रवि गावंडे, राजेश बेले, रावसाहेब कांबे, किशोर मांगटे पाटील, गितांजली शेगोकार, वैशाली शेळके, याेगिता पावसाळे, सुमन गावंडे, रश्मी अवचार, संजय बडोणे, चंदा शर्मा, निलेश निनोरे, माधव मानकर, संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, डॉ. विनोद बोर्डे, गणेश पावसाळे, सिध्दार्थ शर्मा, अनिल मुरूमकार, प्रशांत अवचार, रंजना विंचनकर, विजय इंगळे, जान्हवी डोंगरे, डॉ.शंकरराव वाकोडे, हरिष आलिमचंदानी, अनिल गरड, हरिभाऊ काळे, मंगला सोनोने, आरती घोगलीया, शारदा खेडकर, उमा साहू, साधना येवले, शकुंतला जाधव, दिपाली जगताप, विशाल इंगळे, सतिष ढगे, बाळ टाले यांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 5:55 PM