भाजयुमाेकडून पुतळा दहन
अकाेला: महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजयुमाेच्या वतीने गांधी चाैकात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. यावेळी उज्ज्वल बामनेट, अभिजीत बांगर, नवीन जाधव, शंकर जयराज, भूषण इंडोरिया, केशव हेडा, नितीन राऊत, दर्शन शर्मा, राजेश शर्मा, अमोल गीतेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मालमत्तेला लावले कुलूप
अकाेला: गांधी रोडवरील उत्सव संकुल स्थित हॉटेल युवराज पॅलेसच्या संचालकांकडे सन २०१८ पासून ते आजवर ३,११,५९८ रुपये मालमत्ता कर थकीत हाेता, तसेच दक्षिण झोनअंतर्गत गौरक्षण रोडवरील लक्ष्मीनगर येथील कुणबी समाज विकास मंडळ यांच्या मालमत्तेतील एकूण ९ दुकानांचा सात लाख ५१ हजार रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने, उपराेक्त सर्व मालमत्तांना सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
थकीत कराचा भरणा करा!
अकाेला: शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे १०० काेटींपेक्षा अधिक मालमत्ता कराची थकबाकी आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत शास्ती अभय याेजना सुरू असून, त्यानंतर मालमत्ता जप्त करण्याची धडक माेहीम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीचा भुर्दंड वाचविण्यासाेबतच जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना मालमत्ता कर जमा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
शहरात ६२५ जणांनी दिले नमुने
अकाेला: मागील काही दिवसांपासून जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र समाेर आले आहे. ही लाट ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरीही काेराेना कायम असल्याचे भान ठेवणे अपेक्षित आहे. मंगळवारी काेराेना सदृश्य लक्षणे असलेल्या ६२५ जणांनी नाकातील स्त्रावाचे नमुने दिले आहेत. यामध्ये २२ जणांनी आरटीपीसीआर व ६०३ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली आहे.
शहरात दाेघांना काेराेनाची लागण
अकाेला: मागील काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरल्याचे समाेर आले आहे. असे असले, तरीही अद्याप काेराेनाचा संसर्ग कायम असल्याचे दिसत आहे. मंगळवारी मनपाला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार, पूर्व झाेनमधील एक व उत्तर झाेनमधील एका नागरिकाला काेराेनाची लागण झाली आहे. नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.