अकोला : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुंबईतील बीकेसी सायबर पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसची भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरच्या चौकात होळी करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी महापौर अर्चना मसने, किशोर पाटील, माधव मानकर, चंद्रशेखर पांडे, चंदा शर्मा, सिद्धार्थ शर्मा, संजय गोटफोडे, अक्षय जोशी, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, अग्रवाल, जयंतराव मसने, अंबादास उमाळे, नीलेश निनोरे, राजेंद्र गिरी, अमोल गोगे, संतोष पांडे, पवन महल्ले, जस्मितसिंग ओबेरॉय, उमेश गुजर, अमोल गीते, धनंजय धबाले, उज्ज्वल बामणेट, अभिजित बांगर, टोनी जयस्वाल,भूषण इंदोरिया, अभिषेक भगत, केशव हेडा, वैभव मेहेरे, रितेश जामनेरे, शिवा हिंगणे, शीतलकुमार जैन, जाकीर खान, दीपक कराळे, राहुल धोटे, आदित्य वानखडे, विक्की भिसे, आनंद कदम, सुनीता अग्रवाल, वैशाली शेळके, रश्मी कायंदे, मंगला सोनोने, सुमन गावंडे, जान्हवी डोंगरे, सारिका जयस्वाल, नीलिमा वोरा, साधना येवले, रंजना विंचनकर, नितीन राऊत, श्रीकृष्ण मोरखडे, हरीश अमानकर, सतीश येवले, वसंता मानकर, बाळ टाले, अजय शर्मा, राहुल देशमुख, सिद्धार्थ वराटे, प्रफुल कानकिरड, मनीष बुंदेले, हेमंत मिश्रा, लोकेश तिवारी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.