शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भाजपचे स्वबळ!

By admin | Published: February 24, 2017 2:52 AM

अकोल्यात भारतीय जनता पक्षाचा झंझावात कायम असून, महापालिका निवडणुकीत भाजपाने यावेळी एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.

अकोला, दि. २३- नोटाबंदीनंतर भाजपला अकोल्यातील मतदार नाकारतील, असाच सुरुवातीला सूर होता. प्रतिपक्षांच्या सर्वच नेत्यांनी या विषयावर प्रचारात रानं उठवले. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या अंतिम चरणात घेतलेल्या सभेने शहरातील चित्र पालटले. शहराचा विकासाचे दिलेले त्यांनी आश्‍वासन, स्मार्ट सिटीचे दाखवलेले स्वप्न अकोलेकरांना भावले. त्याचा प्रत्यय ईव्हीएम यंत्रातून आला. ३0 जागांच्या आत भाजपा गुंडाळल्या जाईल, असाच राजकीय विश्लेषकांचा कयास होता. तो खोटा ठरवत अकोलेकरांनी भाजपच्या झोळीत भरभरू न मतदानाचे दानं केलं आहे. महापालिकेच्या ८0 जागांपैकी ४८ जागांवर कब्जा करीत अकोला महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी महापालिकेत २४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय कदाचित भाजपाच्या अंगलट येईल, असेही चित्र रंगविण्यात आले होते. २४ गावांत भारिप-बहुजन महासंघ व शिवसेनेचे वर्चस्व होते आणि बहुअंशी ते सत्यही होते. पण, या निवडणुकीने सर्व चित्रावर डस्टर फेरले असून, २४ गावांतील मतदारांनी काही अपवाद वगळता भाजपलाच कौल दिला आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या २४ गावांतील मतदार, नागरिकांच्या या निकालानंतर आता अपेक्षा वाढल्या आहेत. विकासाच्या बाबतीत निर्णय घेताना भाजपाला आता कोणतीही अडचण येणार नाही, असे समाधान, नव्याने महापालिकेत जुळलेल्या गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर आहे.दरम्यान, अकोल्याच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. विकास कामे वेगाने करण्यासाठीची संधी अकोलेकरांनी भाजपाला दिली आहे. इतर पक्षाच्या दिग्गजांना नाकारत त्यांना घरी बसवले आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि सुरेश पाटील यांच्यासह सलग पाचवेळा निवडणूक जिंकणारे माजी उपमहापौर सुनील मेश्राम यांचाही समावेश आहे.