महामंडळाचे सोयाबीन बियाणे आहे काय?
प्रत्येक कृषी सेवा केंद्रात जाऊन शेतकरी बियाणांबाबत विचारणा करीत आहे; परंतु बियाणे आले आणि संपले हेच उत्तर कृषी केंद्रचालकांकडून मिळत आहे. त्यामुळे आता महामंडळाकडून प्राप्त सोयाबीन बियाणे कृषी केंद्रचालकांनी कधी व कोणत्या शेतकऱ्यांना वाटप केले याची तपासणी करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बार्शीटाकळी तालुक्यात ज्या कृषी सेवा केंद्रांवर महाबीजने सोयाबीन बियाणे दिले. त्या केंद्रचालकांकडून ग्राहक शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी करण्यात आली असून, याद्या प्राप्त होताच पुढील पडताळणी करण्यात येईल.
- दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी, बार्शीटाकळी
प्राप्त झालेले महामंडळाचे सोयाबीन बियाणे
तालुक्यातील माउली कृषी सेवा केंद्र, बार्शीटाकळी- २१६ क्विंटल, आसरा कृषी सेवा केंद्र, बार्शीटाकळी- ९० क्विंटल, ओम कृषी सेवा केंद्र, बार्शीटाकळी- ४३३ क्विंटल असे महाबीजचे बियाणे प्राप्त झाले असताना, कृषी केंद्र संचालक बियाणांचा तुटवडा भासवत आहेत.