शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मुंबई येथे ब्लॉक, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस शुक्रवारी रद्द; शनिवारी परतीची गाडीही रद्द

By atul.jaiswal | Published: May 25, 2024 6:36 PM

शनिवारी परतीची गाडीही रद्द : मुंबई येथे दोन दिवस ब्लॉक

अकोला: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २४ डब्यांच्या गाड्या बसवण्यासाठी प्लॅटफॉर्म १० व ११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंगसाठी ३६ तासांचा विशेष ब्लॉक १ जूनच्या मध्यरात्री ते २ जून २०२४ दुपारपर्यंत घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी स्थानकावरून परिचालीत होणाऱ्या अनेक गाड्या प्रभावित होणार असून, शुक्रवार, ३१ मे रोजी अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवार, ३१ मे रोजी अमरावती येथून सुटणारी १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस प्रस्थान स्थानकावरच रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी १२२९० नागपुर-सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेस व १२२६२ हावड़ा-सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. शनिवार, १ जून रोजी १२१११ अमरावती-सीएएमटी एक्स्प्रेस प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी १२२८९ सीएसएमटी-नागपुर दुरंतो एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस व ०२१४० नागपुर- सीएसएमटी हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस १ जून रोजी ठाणे स्थानकावर स्थगित करण्यात येतील.

विदर्भ एक्स्प्रेस दोन दिवस दादरपर्यंत१२१०६ गोंदिया- सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस ३१ मे व १ जून रोजी, १२८१० हावड़ा- सीएसएमटी मेल एक्स्प्रेस ३० व ३१ मे रोजी, १२८६० गीतांजलि एक्सप्रेस व १२८७० हावड़ा- सीएसएमटी एक्सप्रेस ३१ मे रोजी दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे. या चारही गाड्या परतीचा प्रवास दादर स्थानकावरूनच सुरु करतील.

सेवाग्राम एक्प्रेस दोन दिवस नाशिकपर्यंत१२१४०नागपुर- सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस ३१ मे आणि १ जून रोजी गाड़ी नासिक स्टेशन येथे शार्ट टर्मिनेशन करण्यात येईल. ही गाड़ी नासिक ते सीएसएमटी दरम्यान रद्द राहील. परतीच्या प्रवासात १२१३९ सीएसएमटी- नागपुर सेवाग्राम एक्स्प्रेस १ व २ जनू रोजी नासिक स्टेशन येथून सुटेल.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे