अकोला: ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती तथा तेल्हारा पंचायत समितीचे सभापती आकाश शिरसाट यांचा वाढदिवस शुक्रवार, २ जुलै रोजी रक्तदानाने साजरा करण्यात आला. शिवपुत्र संभाजी प्रतिष्ठान ३०० ग्रुप अकोलाच्या वतीने शहरातील भीमनगर शांतीनगरस्थित विशाखा बुद्धविहार आणि बार्शिटाकळी येथे आयोजित उपक्रमात ४०५ युवकांनी रक्तदान केले.
कोरोना काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी ‘लोकमत’ने पाऊल उचलले असून, ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला २ जुुलैपासून सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती तथा तेल्हारा पंचायत समितीचे सभापती आकाश शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी प्रतिष्ठान ३०० ग्रुप अकोलाच्या वतीने शहरातील भीमनगर, शांतीनगर येथील विशाखा बुद्धविहार येथे २ जुलै रोजी रक्तदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहीम आणि जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान उपक्रमाची भूमिका लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी विशद केली. या कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे उपवृत्त संपादक राजेश शेगोकार यांनी केले. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या रक्तदान उपक्रमात २५० युवकांनी रक्तदान केले. तसेच जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथे १५५ युवकांनी रक्तदान केले. विशाखा बुद्धविहार आणि बार्शिटाकळी येथे आयोजित उपक्रमात ४०५ युवकांनी रक्तदान करून जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रक्तदानाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवपुत्र संभाजी प्रतिष्ठान ग्रुपचे सागर खाडे, अमन खाडे, सागर शिरसाट, सूरज जंजाळ, आशू वानखडे, आनंद दाभाडे, अभिजीत शिरसाट, प्रफुल्ल चक्रनारायण, आदित्य शिरसाट, रोहित शिरसाट, सुमीत सदाशिव, विक्की थोरात, शिवा वैरागडे, कपिल नितनवरे, अमोल शेगोकार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
.....................फोटो.............................................