यावेळी शिवसेना आ. गोपिकिशन बाजोरीया यांनी, पुढील वर्षी या रक्तदान शिबिरात स्वनिधीतून शिवसेना शहराची रुग्णवाहिका उपस्थित करून देऊ, असे सांगितले. तसेच सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, सहसंपर्क संघटिका जोत्स्नाताई चोरे, शहर संघटक संतोष अनासाने यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तरुन बघेरे, नगरसेवक मंगेश काळे, शशिकांत चोपडे, निवासी उपजिल्हा संघटिका नीलिमालाई तिजारे, उपजिल्हा संघटिका शुभांगीताई किनगे, सुनीताताई श्रीवास, शहर संघटिका मंजुषा शेळके, वर्षा पिसोडे, सीमा मोकळकर, संगीता मराठे, गाढे, माधुरी गिरी, विष्णू बुले, रामदास हरणे, दिनू सुरोशे, सुरेन्द्र विसपुते, सुनील डुकरे, तायवाडे, आमले पाटील, शरद तुरकर, युवा सेनेचे नितीन मिश्रा, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल, केदार खरे, नंदकिशोर ढाकरे, प्रकाश वानखडे, विशाल कपले, पप्पू चौधरी, शहर सचिव अविनाश मोरे, पवन पवार, अभिषेक खरसाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.