शासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत जमलेल्या रक्तदात्यांचे कौतुक आपल्या मनोगतातून नगरसेवक धनंजय धबाले यांनी केले.
मंचकावर अकोला जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर, जयंत मसने शशिकांत काळसकर, समाजसेवक दीपक गवारे होते. कोरोना काळात केलेल्या विशेष योगदानाबद्दल व सदैव रक्ताची गरज असणाऱ्याना मदत करणारे साथ ब्लड हेल्पलाइनचे आशिष कसले यांचा सत्कार यावेळी महापौर यांच्या हस्ते करण्यात आला.
खडकी, चांदुर, गायत्रीनगर, उमरी व शहरातील विविध भागांतून आलेल्या ४५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. दरम्यान, मा.आमदार हरिदास भदे, गोपाल गावंडे, मा.जि.प. सदस्य दिनकर नागे, मनीष गावंडे, षण्मुख नाथन, तुलसीदास खिरोडकर, निशिकांत बडगे, रोहित रुंगटा यांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाला राम शेगोकार, के. टी. पद्ममने, संतोष शेगोकार, रामराव उंबरकर गुरुजी, अविनाश चंदन, गोपाल धबाले, राहुल पाचूरकर, शरद डामरे, नंदकिशोर ढाकरे, सचिन वानेडकर, नीलेश चिमणकर, हरीष उंबरकर, सचिन डांगे, खेमराज भटकर, संज्योती मांगे, अमोल नजरधाने, नरेंद्र चिमणकर, अभिजित चिम व बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. गजानन डोईफोडे, तर आभारप्रदर्शन केशव उंबरकर यांनी मानले.