अकोला : माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आवाहनवरून अकोला महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात युवकांनी रक्तदान करून कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, यांच्या सूचनेवरून अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष करण दोड यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात युवकांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष करन दोड, अजिंक्य टेवरे, सागर धयाल, अभिषेक भांडेकर, शुभम राऊत, प्रद्युम्न लोणकर, राज काळे, सुरज गुंजकर, अभय इंगळे, अनंत पाचबोले, किरण हाडोळे, यश साथरोठे, वैभव भोजपत्र, संतोष बुंदे, अभी बवुटे, भूषण चौधरी, दीप मते, सार्थक गडलिंग, यांनी रक्तदान केले. यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी रक्तदान शिबिराला उपस्थित होते. कोरोणाच्या भीषण संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यत रक्तदान शिबिरे आयोजित केली असून त्याचाच एक भाग म्हणून अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष करन दोड यांनीही रक्तदान शिबिर आयोजित केले होते.