भांबेरी ग्राम पंचायतमध्ये महापरिनिर्वाण दिन
भांबेरी: येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण भोजने व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रशासक ठोंबरे, ग्रामसेवक चव्हाण यांची अनुपस्थिती होती.
फोटो:
तिवसा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बार्शीटाकळी: तूर पिकांवरील अळ्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कृषी विभागामार्फत तिवसा येथे ४ डिसेंबर रोजी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी साहाय्यक आर. के. धनभर यांनी मार्गदर्शन करावे. यावेळी पोकराचे विनोद चव्हाण, काशीराम राठोड, संदीप मनवर, सरपंच गजानन लुले, मनोज पाटील, नरेंद्र लुले, भारत बहादरे, अजय लुले, शंकर लुले आदी उपस्थित होते.
वालपी येथे काकडा आरतीची सांगता
तिवसा : वालपी (सालपी) येथे महिनाभर चाललेल्या काकडा आरतीची ५ डिसेंबर रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली. गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अशोक महाराज, पुरुषोत्तम कपले, राम जाधव, मनोहर भांगे, हरिभाऊ कपले, महादेव भोसले, शरद पवार, नारायण पंधरे, भिकाजी चव्हाण, पांडूरंग जाधव, गोपाल काकड आदी उपस्थित होते.
फोटो:
खानापूर येथे ५८ जणांची कोरोना चाचणी
खानापूर : येथील जि. प. शाळेत वैद्यकीय अधिकारी विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ७ डिसेंबर आयोजित शिबिरात कोरोना चाचणी करण्यात आली. शिबिरामध्ये ५८ नागरिकांची कोरोना चाचणी डॉ. चिराग रेवाळे, डॉ. नानवटे, शिंदे, जयश्री माहुलीकर, शुभांगी नगराळे, मोहोकार, नितीन जाधव, आढे, अजहर, सत्यभामा वैरागडे आदींनी केली.
दिनोडा येथे महामानवाला आदरांजली
दिनोडा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रुख्मा घुगे, दिलीप थोरात, सरोज थोरात, सुमेध आठवले, विजय थोरात, धम्मपाल थोरात, नाजूक सरकटे, दामोदर गिते, गणपत सांगळे, सत्यवान घनबहादूर, दीपक थोरात, दादाराव थोरात आदी उपस्थित होते.
फोटो: