या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते हाेणार आहे़. या वेळी अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, गृह विभागाचे उपअधीक्षक नितीन शिंदे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत़
पाेलीस मुख्यालयाचे राखीव पाेलीस निरीक्षक श्रीधर गुलसुंदरे, जिल्हा विशेष शाखेचे मुकुंद कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके, सिटी काेतवालीचे ठाणेदार उत्तमराव जाधव, दहशतवाद विराेधी कक्षाचे प्रमुख तथा रामदासपेठ पाेलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमुख, आकाेट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, खदानचे ठाणेदार डी़ सी़ खंडेराव, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, एमआयडीसीचे ठाणेदार किशाेर वानखेडे, डाबकी राेडचे ठाणेदार विजय नाफडे यांच्यासह पाेलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.