ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. प्रसन्नजीत गवई, रुग्णसेवक पराग गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. या रक्तदान शिबिरात पराग गवई मित्र परिवारातील २५ युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी यशपाल जाधव , संकेत शिरसाट आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सुबोध पाटील, प्रवीण सावळे, अंकुश मेश्राम, अश्विन खंडारे, प्रमोद वानखडे, आशिष वंजारी, अजित जाधव, सचिन चव्हाण, पवन सराटे, राजू वाघमारे, राहुल गुदळे, अक्षय तायडे आदी उपस्थित हाेते.
पराग गवई मित्र परिवाराने केले रक्तदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:15 AM