- प्रवीण खेतेअकोला : रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर ते पॅथॉलाॉजीमध्ये पाठविण्याऐवजी एका खिडकीबाहेर बेवारस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे, रक्त नमुने या ठिकाणी ठेवावे, अशी सूचना खास रुग्णांच्या नातेवाइकांसाठी लावण्यात आली आहे. बेवारस ठेवण्यात आलेल्या रक्त नमुन्यांवरून येथे रुग्णांच्या जीवाची किंमत शून्य असल्याचे स्पष्ट होते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान व्हावे, म्हणून चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. नियमानुसार हे नमुने तपासणीसाठी येथील पॅथॉलॉजीमध्ये जाणे आवश्यक आहे; मात्र वास्तविकतेमध्ये रक्ताचे हे नमुने आपत्कालीन पॅथॉलॉजीच्या बंद खिडकीबाहेर चक्क बेवारस ठेवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु ही पॅथॉलॉजी कुलूपबंद होती. खिडकी मात्र थोडी उघडी होती. या ठिकाणी पाहणी केली असता, कुठलाच कर्मचारी दिसून आला नाही. रुग्णांच्या नातेवाइकांसोबत येणाºया चिमुकल्यांसाठी हा प्रकार घातक असून, नमुन्यावरील लेबल बदलण्यात आल्यास रुग्णावर चुकीचा उपचार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याशी संवाद साधला असता, संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांच्या जीवाशी आणखी किती खेळ करणार, हा संशोधनाचा विषय आहे.या संक्रमणाची भीतीमलेरियाएचआयव्हीएचसीव्हीएचबीव्हीगुप्तरोगरिअॅक्शनमुळे मृत्यूहीनमुन्याचे लेबल बदलण्यात आल्यास रुग्णावर चुकीचा उपचार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रुग्णाला रिअॅक्शन होऊन त्याचा मृत्यूही होऊ शकतो.नियम काय म्हणतोनियमानुसार रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर संबंधित वैद्यकीय कर्मचाºयांमार्फतच ते तपासणीसाठी पॅथॉलॉजीमध्ये जाणे बंधनकारक आहे; मात्र या ठिकाणी घेतलेल्या रक्ताचे नमुने रुग्णांच्या नातेवाइकांच्या हाती दिले जातात व ते पॅथॉलॉजीमध्ये देण्यास सांगितले जाते. या बाबतीत विचारणा केली असल्यास अपुºया मनुष्यबळाचे कारण समोर केले जाते.साहेब म्हणतात, नमुने खिडकीतच ठेवा...या प्रकाराची आणखी खोलात पडताळणी करण्यासाठी येथील मुख्य पॅथॉलॉजीमध्ये विचारणा केली. सुरुवातीला त्या कर्मचाºयाने रक्ताचे नमुने व वैद्यकीय चिठ्ठी मागितली; पण वॉर्डातूनच रक्त नमुने घेण्यात आल्याचे सांगितल्यावर इतर रुग्णांप्रमाणे आपत्कालीन पॅथॉलॉजीच्या बाहेरच तुमचेही रक्त नमुने ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.आपत्कालीन पॅथॉलॉजी सायंकाळी पाच वाजतानंतर सुरू होते. या प्रकरणासंदर्भात संबंधित विभाग प्रमुखांची चौकशी केली जाईल.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.