अकोला : संपूर्ण देशभर हर्षोल्हासात साजरा होणारा नवरात्र उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठे पला आहे. २५ सप्टेंबर रोजी देवीची स्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात असून, भाविक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. जिल्ह्यात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. शेकडो सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळे देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. त्यामुळे शहरातील गांधी चौक, जय हिंद चौकातील बाजारपेठ नवदुर्गा उत्सवासाठी लागणार्या साहित्याने फुलली आहे. विविध सार्वजनिक मंडळातर्फे नऊ दिवस विविध रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जिल्ह्यात नवरात्र उत्सवात दांडिया व गरबा खेळण्याचे प्रमुख आकर्षण असते. शहरात गत तीस-चाळीस वर्षांंपासून गरबा खेळण्याचे आयोजन मुंगीलाल बाजोरिया, एकविरा नवदुर्गा उत्सव मंडळ, चौधरी विद्यालय यासह विविध मंडळांच्याव तीने करण्यात येते. रामदासपेठ परिसरातील योगायोग नवदुर्गोत्सव मंडळद्वारे दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे करण्यात येतात. यावर्षी या मंडळाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे देखावे साकारण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील संकट तसेच माळीण गावातील संकट हे पर्यावरणाच्या र्हासामुळे झाले. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा मोलाचा संदेश, या मंडळाद्वारे देण्यात येणार आहे. तसेच स्वराज्य भवनात शहरात वास्तव्यास असलेल्या बंगाली नागरिकांच्यावतीने देवीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात येतो. पाच दिवसांचा असणार्या या महोत्सवाला हजारो भाविकांची हजेरी असते. तसेच विविध मंडळांच्यावतीनेही गरबाचे आयोजन करण्यात येते.
नवरात्रोत्सवासाठी मंडळ, प्रशासनाची लगबग
By admin | Published: September 25, 2014 2:48 AM