मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभागातील कापड व्यवसायी राजेश्वर मेन्स वेअर चे संचालक बंटी गोहिल यांचे वडील बंधू योगेश गोहील यांचे रविवार दि. ९ जानेवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मरणोपरांत देहदान करुन समाजकार्य केले. मागील काही दिवसापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू होते. भविष्यात आपले अवयव इतरांसाठी उपयोगी पडतील याची जाणीव दिली असता त्यांनी स्वखुशीने ४ एप्रिल २०१८ रोजी आपले मृत्यू उपरांत देहदानाची तयारी दर्शविली, तसेच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे एका संकल्प पत्राद्वारे संकल्प घेतला होता आणि त्यानुसार रविवारी त्यांच्या या निधनानंतर त्यांच्या शरीराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे नेऊन उपस्थित डॉक्टर ना देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ एक बहीण आणि परिवार आहे ते दुर्ग निवासी असून त्यांनी बर्याच कंपनीमध्ये काम करत शेवटी मूर्तिजापूर येथे अखेरचा श्वास घेतला. देहदान च्यावेळी परिवारातील सदस्य भूषण (बंटी) गोहिल, भावेश झाला, मनोज अग्रवाल, रुग्नवाहक सेनापति, डॉ. सुधीर व्ही पंडित व त्यांचे सहकारी डॉ उपस्थित होते.
मूर्तिजापूर येथील योगेश गोहिल यांनी केले मरणोपरांत देहदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2022 7:19 PM