शिवणी येथून रत्नामाला जानकीराम मेटांगे (४५) रा. वाकलवाडी ता.मालेगाव जि. वाशिम ही महिला २९ मार्च रोजी दोनद खु. येथे एका कार्यक्रमानिमित्त आली होती. यावेळी रत्नामाला मेटांगे व सोबत एक महिला दुपारी आसरामाता मंदिराजवळ असलेल्या काटेपूर्णा नदीच्या डोहात पोहत होत्या. यावेळी रत्नामाला मेटांगे ही महिला डोहात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण केले. सोमवारी व मंगळवारी दोनद खु. आणि दोनद बु. येथील नागरिकांसह संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, सहकारी उमेश बिल्हेवार, ऋषिकेश तायडे, राहुल साटोटे, मयुर जवके, अक्षय भड, महेश घटाळे, उल्हास आटेकर, अतुल उमाळे, अंकुश महल्ले शेलु.खु. यांनी शोध व बचाव साहित्याच्या साहायाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; मात्र त्यांच्या महिला आढळून आली नाही. महिला नेमकी कोणत्या ठिकाणी बुडाली ही माहिती नव्हती आणि डोहात मध्यभागी ३५ फूट खोल पाणी असल्याने शोध कामात अडथळा येत होता. अखेर ३१ मार्च रोजी दुपारी ११.४५ वाजता महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी पोलिस कर्मचारी महादेव सोळंके, भीमराव जाधव आणि शिवणी येथील सरपंच प्रवीण पातोडे व नातेवाईक हजर होते. पुढील कारवाई ठाणेदार महादेव पडघान यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार महादेव सोळंके करीत आहेत.
डोहात बुडालेल्या महिलेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:20 AM