- राजरत्न सिरसाट
अकोला : यावर्षीही मे महिन्यात नामांकित कंपन्यांचे बीटी कापसाचे बियाणे मिळणार नसल्याने पूर्व हंगामी पेरणीसाठी विदर्भात सर्रास बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. असे बियाणे आतापासून बाजारात आले असल्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे.मागील वर्षी मे महिन्यापर्यंत बीटी कपाशीचे बियाणे विक्री करण्यास विक्रेत्यांना कृषी मंत्रालयाने मनाई आदेश काढले होते. तरिही शेतकऱ्यांना बीटी बियाणे उपलब्ध झाले. ते बियाणे नामांकित कंपन्यांचे नसल्याने त्यावर बोंडअळ््याचा प्रादुर्भाव दिसून आला. यावर्षीही मनाई कायम असल्याने आतापासून बोगस बियाणे आले असल्याचे वृत्त आहे. विदर्भातील कापसाचे क्षेत्र सोयाबीनने घेतले असले, तरी या खरीप हंगामात कापसाचा पेरा कायम राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकºयांचा कल बीटी कापसाचे बियाणे खरेदी करण्यावर राहील; परंतु त्यांच्या माथी यावर्षीही बोगस बीटी कापसाचे बियाणे मारले जाण्याची शक्यता आहे. हे बियाणे अर्ध्यां किंमतीत मिळते हे विशेष. पण ते अधिकृत नसून, अशा बियाण्यांना शासनाने विकण्याची परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, बियाणे तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही. असे असताना या बीटीची विदर्भात चार-पाच वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. मागील वर्षी कृषी विभागाने काही विके्रत्यांवर थातूरमातूर कारवाई केली असली, तरी यावर्षी मात्र या बोगस बियाण्यावर आतापासूनच लक्ष देण्याची गरज आहे.-विभागाशी संपर्क साधावाकृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या मागावर आहे; परंतु शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेणे गरजेचे आहे. कृषी सेवा केंद्रधारक पावती देण्यास नकार देत असेल, तर शेतकºयांनी १८००२३-३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा.-यावर्षी बोगस बीटी कापूस बियाणे विक्रीवर आतापासूनच पाळत ठेवण्यास सुरुवात केली असून, जेथे बीटी कापसाचे बियाण्याची विक्री होते, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी तैनात असेल. बीटी बियाण्याच्या विक्रीची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार आहे, तसेच विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.- विजयकुमार इंगळे,संचालक,गुणनियंत्रण विभाग,पुणे.