संतोषकुमार गवई
पातूर :शहरासह तालुक्यामध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले मात्र नियोजन शून्य कारभारामुळे आणि ठेकेदारी चे ग्रहण लागल्यामुळे सदर योजनेचा बाेजवारा उडाला आहे ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावरच शौचक्रिया करत असून ग्रामीण भागांमध्ये घाणच घाण पसरल्यामुळे विविध रोगांना आमंत्रण मिळत असून प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे
तालुक्यामधील प्रत्येक गावांमध्ये भारत निर्मल शौचालय योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालय चा लाभ देण्यात आला मात्र सदर योजनेला कमिशन खोरी आणि ठेकेदारी पद्धतीचे ग्रहण लागल्यामुळे शौचालय नावापुरते बांधण्यात आले असून शौचालय योजनेचे अनुदान लाटण्यात आले आहे गावागावांमध्ये वैयक्तिक शौचालय असतानाही संपूर्ण नागरिक गावाच्या सभोवती उघड्यावरच शौचक्रिया करत आहेत त्यामुळे दुर्गंधी आणि घाण पसरली असून मच्छर डासांचा ही उच्छाद झाला आहे ग्रामीण विभागातील नागरिक मलेरिया सदृश्य डेंग्यूसदृश अज्ञात रोगाने ग्रस्त असून तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेताना दिसत आहेत पातुर तालुक्यातील काही गावे हागणदारीमुक्त असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले मात्र प्रत्यक्षामध्ये जी गावे हागणदारीमुक्त आहेत अशा गावामध्ये जास्तीत जास्त नागरिक उघड्यावर शौच क्रिया करत आहेत पातुर नगरपरिषद आणि पंचायत समिती मार्फत मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली आहे मात्र तीही कागदावर आहे मागील चार ते पाच वर्षापासून मॉर्निंग पथकाची कुठेही कोनत्यही उघड्यावर शौच क्रिया करणाऱ्या नागरिकावर कारवाई करण्यात आली नाही तत्कालीन पंचायत समिती सभापती सौ सविता धाडसे त्यांनी सर्व ग्रामसेवकांना सूचना पत्र देऊन याबाबत जाब विचारला होता मात्र सभापतीच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली असून भारत निर्मल शौचालय योजनेचा बट्ट्याबोळ करण्यात आला आहे
यावर्षी शासनाकडून गुड मॉर्निंग पथकाचे आदेश किंवा पत्र आले नसल्यामुळे गुड मॉर्निंग पथके नाहीत
अनंत लव्हाळे पातुर पंचायत समिती व्हीडीओ /बिडिओ