- विठ्ठल बोळे लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव (अकोला): परतीच्या पावसाने आधीच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च लावलेल्या कपाशीतून केवळ ३५३ किलोच उत्पादन झाल्याने डोंगरगाव येथील तीन शेतकऱ्यांनी १४ एकरातील पºहाटी कापून टाकली आहे.डोंगरगाव येथील शेतकरी रमेश नारायण देवकर आणि गणेश देवकर यांनी नऊ एकर शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड केली होती. पीक चांगले होते; मात्र ऐन बोंड्या लागण्याच्या काळात संततधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसाने बोंड्या काळ्या पडल्या तर फुले आणि पाती गळून पडली. तरीही कपाशी पिकाला लागलेला खर्च निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आशेवर त्यांनी वेचणी केली असता नऊ एकर शेतामध्ये केवळ १ क्विंटल ५० किलो कापूस आला. पहिल्या वेचणीनंतर २० ते २५ दिवसांनीही कपाशी फुटली नाही. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये पाहणी केली असता बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याचे आढळले. त्यांना ९ एकरात केवळ आतापर्यंत १५० किलो कापसाचे उत्पादन झाले. यामध्ये वेचणीसाठी ९ मजूर लागले. त्यांची मजुरी १ हजार ८०० रुपये झाले. कापसाचा दर्जा चांगला नसल्याने केवळ ३५०० रुपयांचा मिळाला. त्यामुळे आतापर्यंत लागलेला खर्चही निघाला नसल्याने हताश झालेल्या शेतकºयांनी ९ एकरातील पºहाटी कापून टाकली.हीच परिस्थितील संतोष रूपसिंग राठोड यांच्यावर आली. त्यांनी बाळासाहेब देशमुख यांची पाच एकर शेती पाच एकर पन्नास हजार रुपये देऊन केली. त्यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. पेरणीपासून तर आतापर्यंत कपाशीची मशागत, फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला. कापसाची पहिली वेचणी केली असता, त्यांना केवळ २१३ किलो कापूस झाला. त्यानंतर कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी हताश होऊन आपल्या पाच एकरातील पºहाटी कापून टाकली. ५० हजार रुपये देऊन त्यांनी शेती केली होती.