अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते ‘पीसीपीएनडीटी’च्या बोधचिन्हाचे व कृषी कार्यालयाच्या माहिती पुस्तकाचे विमोचन करणे संबंधित वरिष्ठ अधिकाºयांच्या चांगलेच अंगलट आले. बोधचिन्हासह माहिती पुस्तिकेला बंदी असलेल्या प्लास्टिकचे आवरण असल्याप्रकरणी जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने दोन्ही यंत्रणांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे जिल्हाधिकाºयांची कर्तव्याप्रती स्पष्ट व रोखठोक भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.देशभरात राबविल्या जाणाºया रुबेला लसीकरण मोहीम व प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी नियोजन सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाच्यावतीने ‘पीसीपीएनडीटी’च्या जनजागृतीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पीसीपीएनडी‘पीसीपीएनडीटी’ची जनजागृती करण्यासाठी संबंधित वैद्यकीय यंत्रणेच्यावतीने बोधचिन्ह व फलक तयार करण्यात आले असता या बोधचिन्हाचे व फलकाचे विमोचन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते केल्या जाणार होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील आत्मा समितीच्यावतीने राष्ट्रीय कडधान्य दिवसाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार असून, त्यामध्ये शेतकºयांसाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमांमधील बोधचिन्ह व माहिती पुस्तिके चे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते विमोचनाचा कार्यक्रम पार पडणार होता. त्यावेळी बोधचिन्ह व माहिती पुस्तिकेला राज्य शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे आवारण लावण्यात आल्याचे दिसून येताच जिल्हाधिकाºयांनी कारवाईचे अस्त्र उगारले.अधिकाºयांची कानउघाडणी!राज्य शासनाने प्लास्टिकपासून तयार होणाºया विविध वस्तूंवर बंदी घातली असताना तुम्ही बोधचिन्ह व माहिती पुस्तिकेला प्लास्टिकचे आवरण घातलेच कसे, असा सवाल उपस्थित करीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची व कृषी विभागातील अधिकाºयांची चांगलीच कानउघाडणी केली. यामुळे सर्वसामान्य जनतेत चुकीचा संदेश जाईल, असे नमूद करीत प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी दोन्ही यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आला.मनपाने ठोठावला दंड!जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत राजुरकर, आरोग्य निरीक्षक किरण खंडारे यांनी नियोजन सभागृहात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सकांच्यावतीने प्रतिनिधी शुभांगी खाडे यांना पाच हजार रुपये तसेच आत्मा समितीच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई केली.