अकोला : अकोला आरोग्य परिमंडलात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील शीतसाखळीत (कोल्ड चेन) आता ६७ डीप फ्रीजरची भर पडली आहे. केंद्र शासनाकडून नुकतेच ६७ डीप फ्रीजर अकोला मंडळासाठी प्राप्त झाले असून, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हानिहाय वितरण करण्यात येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी असल्याने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आता अतिरिक्त लससाठा आणि आता ६७ डीप फ्रीजर विभागासाठी मिळाले आहेत. यातील १० डीप फ्रीजर अकोला जिल्ह्यासाठी असल्याची माहिती अकोला येथील वरिष्ठ औषधनिर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिली आहे. जिल्हानिहाय याचे वितरण होत असून, डीप फ्रीजरच्या वितरण कामात बायोमेडिकल इंजिनिअर नितीन सावळे आणि त्यांच्या चमूचे सहकार्य लाभत आहे.
असे आहे वितरण
डीएचओ, सीएस अकोला - ८
अकोला मनपा - २
डीएचओ, सीएस अमरावती - १०
डीएचओ, सीएस बुलडाणा - १२
डीएचओ, सीएस यवतमाळ - २५
डीएचओ, सीएस वाशिम - १०
अकोला मंडल - ६७