शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

बोरगाव मंजू : परिस्थितीवर मात करीत सिरसाट भगिनींची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:58 AM

अकोला : हलाखीची परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बोरगाव मंजू येथील करुणा आणि भावना या भगिनींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए.च्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावला. 

ठळक मुद्देपहिला व तिसरा क्रमांक पटकाविला अमरावती विद्यापीठ गुणवत्ता यादी  

संदीप वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हलाखीची परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बोरगाव मंजू येथील करुणा आणि भावना या भगिनींनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए.च्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावला. अठराविश्‍वे दारिद्रय़ असल्याने घरात शिक्षणाचे कोणतेच वातावरण नसताना सिरसाट भगिनींनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. सिरसाट कुटुंबाच्या बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगरात एका छोट्या घरात करुणा आणि भावना राहतात. त्यांचे वडील बंडू सिरसाट हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. आई ज्योती सिरसाट यांचे पाचवीपर्यंत आणि वडिलांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले. आपले शिक्षण कमी झालेले असले, तरी आपल्या मुलींचे शिक्षण कमी होऊ नये, यासाठी दोघेही धडपड करीत आहेत. मोलमजुरी करून आपल्या मुलींसह मुलाचे शिक्षण सिरसाट दाम्पत्य करीत आहेत. आई-वडिलांच्या परिश्रमाची जाण असलेल्या भावना आणि करुणा यांनीही चांगली मेहनत घेऊन यश मिळवत आहेत. संत गजानन महाराज महाविद्यालयात त्यांनी बी.ए. पूर्ण केले. बी.ए. अंतिम वर्षांची परीक्षा त्यांनी २0१७ मध्ये दिली होती. यामध्ये करुणा हिने तिन्ही वर्षांच्या एकूण १५00 गुणांपैकी १२३८ गुण घेत ८२.५३ टक्के गुण मिळवले, तर भावना हिने तिन्ही वर्षांच्या एकूण १५00 गुणांपैकी १२१७ गुण घेत ८१ टक्के गुण मिळवले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात  करुणा ही विद्यापीठातून प्रथम, तर भावना ही विद्यापीठातून तिसरी आली आहे. कुठल्याही सुख-सुविधा नसताना, हातमजुरी करतानाच मेहनत आणि परिश्रमाच्या बळावर दोन्ही बहिणींनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. परिस्थिती गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड येत नसल्याचे या दोन्ही भगिनींनी सिद्ध केले आहे. या भगिनींना आई-वडिलानी परिस्थिती नसतानाही पाठबळ दिल्याने त्या हे यश मिळवू शकल्या. या भगिनींना संस्थाध्यक्ष गजानन दाळू गुरुजी, सचिव ओमप्रकाश दाळू, सहसचिव दिवाकर गावंडे, प्राचार्य डॉ. पूजा सपकाळ, डॉ. राठोड आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. 

बारावीतही बोर्डातून प्रथम व द्वितीयकरुणा आणि भावना यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक बारावीपासून दाखवली. इयत्ता बारावीमध्ये अमरावती बोर्डातून कला शाखेत दोन्ही भगिनींनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच महाराष्टातून त्या दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होत्या. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरuniversityविद्यापीठAmravatiअमरावती