लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा गावांपैकी एक असलेल्या बोरगाव मंजू येथील दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांनी पुकारलेल्या लढय़ाला अखेर १0 सप्टेंबरला अपयश आले. येथील दारूची दोन्ही दुकाने बंद व्हावी, या महिलांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, १0 सप्टेंबर रोजी महिलांचे मतदान घेण्यात आले. गावातील महिल्यांच्या एकूण ५,६४२ मतदानांपैकी केवळ २६१७ मतदान झाले. यापैकी ९६ मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या २५२१ मतांपैकी दुकान सुरू ठेवण्याच्या बाजूने १५८ मते पडली, तर दुकान बंद करावे, या बाजूने २३६३ मते पडली; परंतु दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक असलेला २८२२ चा आकडा गाठू न शकल्याने महिलांचा दारुबंदी विरुद्धचा हा लढा अपयशी ठरला.राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावर असलेल्या बोरगाव मंजू येथे १ एप्रिलपासून दारूची दुकाने बंद होती. त्यानंतर संबंधित विभागाने शहरातील बंद दुकाने स्थानांतरित करून नव्याने सुरू केली होती. त्यामुळे गावातील दारू दुकाने कायम बंद झाली पाहिजे, या मागणीसाठी गाव दारूबंदी महिला व पुरुष संघर्ष समितीने प्रशासनाला निवेदन दिले होते.
बोरगाव मंजूतील बाटली उभीच राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 3:02 AM
बोरगाव मंजू : जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा गावांपैकी एक असलेल्या बोरगाव मंजू येथील दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांनी पुकारलेल्या लढय़ाला अखेर १0 सप्टेंबरला अपयश आले. येथील दारूची दोन्ही दुकाने बंद व्हावी, या महिलांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, १0 सप्टेंबर रोजी महिलांचे मतदान घेण्यात आले.
ठळक मुद्देदारू दुकानांना अभय : महिलांचा लढा अपयशी