अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार २२ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २१३ वर पोहचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६७५० झाली आहे. दरम्यान, मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जीएमसी येथील पाच, पारस व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, अष्टविनायक कॉलनी, मोठी उमरी, शिवाजी नगर, जूने शहर व खडकी येथील प्रत्येकी दोन, रेल ता. अकोट, आळशी प्लॉट, संतोष नगर, गोकूल कॉलनी, महसूल कॉलनी, डाबकी रोड, संकल्प कॉलनी, बाळापूर, हरिहर पेठ, बाशीर्टाकळी, चांदूर, अकोट, फीरदोस कॉलनी, चान्नी ता. पातूर, स्वराज्य पेठ, दहिगाव गावंडे, कौलखेड, अकोट फैल, राऊतवाडी व चोहट्टाबाजार येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जूना तारफैल येथील पाच, हरिहर पेठ व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, खोलेश्वर व अकोट येथील प्रत्येकी दोन, शिवाजी नगर, गीता नगर, मोठी उमरी, माधव नगर, जून कापड मार्केट, बजरंग चौक, रेणूका नगर, रणपिसेनगर, बहीर गेट, गोकूल कॉलनी, देवराव बाबा चाळ, खडकी, जवाहर नगर, जयहिंद चौक, वानखडे नगर, देशमुख फैल, सिंधी कॅम्प, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, व गौरक्षण येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.एक महिला, एक पुरुषाचा मृत्यूमंगळवारी अकोला शहरातील आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये कौलखेड भागातील ७२ वर्षीय महिला आणि सिव्हील लाईन परिसरातील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही १५ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.१,७४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,७५० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,७९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,७४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
दिवसभरात दोघांचा मृत्यू; ७८ नवे पॉझिटिव्ह; १३ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 7:19 PM