शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

ट्रकच्या चाकाखाली आल्याने युवकाचे दोन्ही हात निकामी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:03 PM

मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्गावरील नागठणा गावाजवळ ट्रकने (ट्रेलर) धडक दिल्याने २५ वर्षीय युवक गंभीर जखमी होऊन त्याच्या दोन्ही हाताचा ...

मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्गावरील नागठणा गावाजवळ ट्रकने (ट्रेलर) धडक दिल्याने २५ वर्षीय युवक गंभीर जखमी होऊन त्याच्या दोन्ही हाताचा चेंदामेंदा झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली.

सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात, याच पृष्ठभूमिवर मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथे मध्यप्रदेशातील खेरवाडा ता. आडनेर जि. बैतूल येथील मजूर काम करणासाठी आला आहे. 

विजय सुलाभ कुमरे (२५)  हा पहाटे शौचाला जातो म्हणून मुक्कामाच्या ठिकाणावरुन चालत राष्ट्रीय महामार्गाने नागठणा गावाजवळ पोहोचला असता अमरावतीकडून येणाऱ्या भरधाव (ट्रेलर) ट्रक क्रमांक आर जे ०७ जीसी ४२३९ ने धडक दिली त्यामुळे विजय कुमरे हा समोरच्या चाखाली आला, तो किमान २५ फुट चाका सोबत घासत (फरफटत) गेल्याने त्याच्या दोन्ही हाताचा चेंदामेंदा होऊन पुर्ण निकामी झाले. 

पाठीला व पायांना गंभीर दुखापत झाली आहे, जखमी विजय याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात रतनलाल शाहू कुमरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, हेड कॉन्स्टेबल विजय मानकर करीत आहे. 

टॅग्स :Akolaअकोला