अकोला, दि. ४- जिल्हय़ातील दृष्टिहिनांना ब्रेल लिपीत लिहिलेली अधिकाधिक पुस्तके वाचता यावी, या दृष्टिकोनातून महिन्याभरातच रतनलाल प्लॉटमधील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड (नॅब)च्या कार्यालयात ह्यब्रेल ग्रंथालयह्ण साकारण्यात येणार असल्याचे डॉ. अविनाश पाटील यांनी सांगितले. लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी ह्यनॅबह्णच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्यांनी ही घोषणा केली.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. विशाल कोरडे, प्रा. अरविंद देव, मीनल भेंडे, डॉ. नितीन पाध्ये, राम शेगोकार, प्रा. राजेश सोनकर हे उपस्थित हो ते. यावेळी मीनल भेंडे यांनी सावित्रीबाई फुले कौशल्य विकास व अंध बांधवांकरिता उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. विशाल कोरडे, प्रा. अरविंद देव यांनी ब्रेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. नॅबच्या कार्यालयात दर रविवारी विशेष कार्यशाळा घेतली जाणार असून, त्यात अंध बांधवांना संगणक ज्ञान, ब्रेल लिपी व स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती संस्थाध्यक्षांनी दिली. कार्यक्रमाला अँड. अनंत गवई, डॉ. अनंत शेवाळे, सुधा ठाकरे यांच्यासह जिल्हय़ातील अंध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
‘नॅब’च्या कार्यालयात साकारणार ‘ब्रेल ग्रंथालय’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 2:30 AM