अकोला : ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आला. त्या निधीतून किती काम झाले, समितीकडे किती निधी शिल्लक आहे, तो वसूल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने शाखा अभियंत्यांना उद्दिष्ट दिले आहे. कामांचे मूल्यांकन करून वसुलीची रक्कम ठरवली जाणार आहे.ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपवण्यात आली. समितीने केलेल्या कामात निधी अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. ठरलेल्या काळात पूर्ण न झालेल्या तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित योजना शिल्लक निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शाखा अभियंत्यांना योजनेचे काम तपासण्याचे उद्दिष्ट दिले. अपूर्ण कामांचे मूल्यांकन करून उर्वरित निधी जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली. त्याचा आढावा आता दर पंधरवड्यात घेतला जाणार आहे.- कोट्यवधींच्या खर्चाचा हिशेब लागणारजिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून समितीच्या खात्यावर निधी देण्यात आला. ७२ पैकी ६९ योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्यासाठी २५ कोटी ६ लाख ७३ हजारांपैकी १६ कोटी ३९ लाख २५ हजार रुपये निधी खर्च झाला. त्याचा हिशेब आता अभियंते घेणार आहेत. तीन ते चार योजना वगळता एकाही गावात पिण्याचे पाणी मिळाले नाही, हे विशेष.- या गावातील योजनांची होणार तपासणीबार्शीटाकळी तालुक्यातील परंडा, तामशी, काजळेश्वर, उमरदरी, पाराभवानी, भेंडीमहाल, महान, साहित, सुकळी, खेर्डा, राजनखेड, महागाव, भेंडगाव, महागाव माळी, चोहोगाव, लोहगड, सावरखेड. अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर, चंडिकापूर, देऊळगाव, उमरा, बोर्डी, जळगाव नहाटे. तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु., सदरपूर, धोंडा आखर, चितलवाडी, चांगलवाडी, खाकटा, दानापूर, खापरखेड, वडगाव रोठे. बाळापूर तालुक्यातील कळंबा बु., तामशी, झुरळ, कसुरा, सावरपाटी, मनारखेड, पिंपळगाव, सोनगिरी, खिरपुरी बु., कडोशी, व्याळा, बारलिंगा, कवठा, लोहारा. पातूर तालुक्यातील पांढुर्णा, पांगरा, डिग्रस, सोनुना, निमखेड, राहेर, सावरगाव, पळसखेड, अडगाव खु., सस्ती, भंडारज खु., खापरखेडा, हिंगणा वाडेगाव, सुकळी, अंबाशी, चतारी, पिंपळखुटा. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी, दाताळा, नवसाळ, सोनोरी. अकोला तालुक्यातील लाखनवाडा, कापशी या गावांतील योजनांचा समावेश आहे.
कोट्यवधींच्या खर्चातील घोळ शोधणार पाणी पुरवठा योजनांचे शाखा अभियंते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:47 PM
अकोला : ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आला. त्या निधीतून किती काम झाले, समितीकडे किती निधी शिल्लक आहे, तो वसूल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने शाखा अभियंत्यांना उद्दिष्ट दिले आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपवण्यात आली. समितीने केलेल्या कामात निधी अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शाखा अभियंत्यांना योजनेचे काम तपासण्याचे उद्दिष्ट दिले.