अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होत असून, मंगळवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करण्यात आलेल्या ८६५ चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, आणखी सात जणांनी कोरोनावर मात केल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटली असून, आता केवळ ३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून आरटीपीसीआर चाचण्यांचे ३०७ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह नाही. सोमवारी दिवसभरात ५५८ रॅपिड चाचण्या पार पडल्या. यामध्येही कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. जुलै महिन्यात सुरु झालेली घसरण ऑगस्ट महिन्यातही कायम आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होऊ शकतो.
सात जण कोरोनामुक्त
कोरोनाबाधित होणार्यापेक्षा या आजारातुन मुक्त होणार्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा व आधार हॉस्पीटल येथील एक अशा सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला.