लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका एएसआयला १ हजार ५00 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी बाळापूर पोलीस ठाण्यातून रंगेहात अटक केली. संजय रामेश्वर पारसकर असे लाचखोर एएसआयचे नाव असून, त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.बाळापूरमधील रहिवासी तसेच खासगी इलेक्ट्रिशियनविरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर दखलपात्र गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल करणे आणि अटक टाळण्यासाठी बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजय रामेश्वर पारसकर या एएसआयने एक हजार ५00 रुपयांची लाच मागितली होती; मात्र सदर व्यक्तीला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून पडताळणी केली असता एएसआय पारसकर याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सदर लाचेची रक्कम घेऊन शुक्रवारी ठाण्यात बोलावल्यानंतर सापळा रचून असलेल्या अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी एएसआय संजय पारसकर याला तक्रारकर्त्याकडून १ हजार ५00 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात मंगेश मोहोड, सुनील राऊत, ज्ञानेश्वर सैरीसे यांनी केली.
अधिकार्यांची चौकशी होण्याची शक्यतासदर लाच प्रकरणात पोलीस अधिकार्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एएसआय पारसकर याने लाच स्वीकारल्यानंतर यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येणार असून, वरिष्ठ अधिकार्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.