अकोला : राष्ट्रीय, राज्य महामार्ग, गावे, वस्त्यालगत सुरू असलेल्या वीटभट्ट्यामुळे प्रदूषणात होत असलेली वाढ रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याला बगल देण्याचा प्रकार केला आहे. पावसाळ््यात विटांचे उत्पादन बंद असताना भट्ट्यांची तपासणी करून तेथे ठरलेल्या उत्पादन मर्यादेत विटांची निर्मितीच होत नसल्याचा अहवाल तयार करण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने एप्रिल २०१८ मध्येच वीटभट्ट्यांचा अहवाल मंडळाकडे दिला होता.प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील पारंपरिक वीटभट्ट्यांसाठी (स्थान, निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६ प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या वीटभट्ट्या कोणत्या ठिकाणी असू नयेत, याबाबत विविध ठिकाणे, रस्ते, गावांपासूनचे अंतरही निश्चित केले आहे. या नियमांचा भंग करणाऱ्या वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत. त्यासाठी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या संपूर्ण वीटभट्ट्यांची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांकडून घ्यावी, त्या वीटभट्ट्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी, त्यानंतर कारवाई करावी, असे निर्देश सातत्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हवा प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक डॉ. वि.मो. मोटघरे यांनी दिले. तसेच त्याबाबतच्या कारवाईचा अहवालही राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाºयांकडून मागवला. तोही सादर केला जात नसल्याची माहिती आहे.- आधी महसूल विभागावर खापरप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिनियमानुसार कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडून वीटभट्टी व्यावसायिकांची यादीच दिली जात नाही, असा पाढा प्रादेशिक अधिकारी कार्यालयांनी वाचला. त्यामुळे कारवाईच करता येत नाही, असेही वरिष्ठ कार्यालयाला कळवले. अकोला जिल्ह्यातील वीटभट्ट्यांची यादी मिळाल्यानंतर काहींना केवळ नोटीस बजावण्यात आल्या. त्यापुढे प्रदूषण नियंत्रण मंडळाने काहीच केले नसल्याची माहिती आहे.- कारवाई टाळण्यासाठी पावसाळ््यात मोहीमजिल्ह्यातील वीटभट्ट्यांमध्ये विटांची निर्मिती पावसाळा सुरू होताच बंद केली जाते. आधी उत्पादित विटांची विक्री केली जाते. भट्ट्यावर असलेल्या साठ्यात सतत घट होते. त्यामुळे या काळात भट्ट्यांची पाहणी केली असता अधिनियमातील तरतुदीपेक्षा कमी क्षमतेची निर्मिती असल्याने कारवाई करता येत नाही, असा पवित्रा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतला जात असल्याची माहिती आहे.- अहवालात विटांच्या निर्मितीमध्ये तफावतछोट्या वीटभट्टीवर एका भट्टीतून ४० हजार विटांची निर्मिती केली जाते. त्यासाठी ४० ब्रास माती एका आठवड्यात लागते. महिन्याला १६० ते २०० ब्रास माती या भट्टीवर लागते. नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात १२०० ते १४०० ब्रास मातीचा वापर त्या वीटभट्टी मालकाकडून केला जातो. आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात, असे असताना तेथे ५० हजारांपेक्षा कमी विटांची निर्मिती केली जाते, असा अहवाल प्रदूषण मंडळाकडून तयार केला जात आहे.