शहापूर-दिग्रस बु. मार्गावरील पुलावरून शेकडो प्रवासी व वाहने येणे-जाणे करतात. तसेच याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांकरिता व पायी जाणाऱ्या नागरिकांना जाण्यासाठी-येण्यासाठी हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे. या पुलावरील कठडे चोरट्यांनी काढून नेले तर काही सिमेंट बांधकाम कठडे फोडून पाण्यात टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी वाहन खाली कोसळू शकते किंवा जीवित होऊ शकते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलावरील खड्डे दुरुस्ती करून कठडे बसविण्याची गरज आहे. रस्त्याची दुरुस्ती करून पुलावर दोन्ही बाजूने कठडे बसविण्याची मागणी प्रतीक पंजाब गवई, नागेश हरीमकार, कुलीन हिवराळे, तुलंगा बु. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसेनजीत रोकडे, विजय हातोले, सागर हातोले, अनुप तायडे आदींनी केली आहे.
फोटो:
कठड्यांअभावी पूल धोकादायक बनला असून, या पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे कधीही खाली तोल जाऊन अपघात घडू शकतो. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी.
-सुमेध हातोले, तालुका सचिव वंचित बहुजन आघाडी पातूर
पुलाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडे चर्चा करून पुलाला कठडे बसवून दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
-सुनील फाटकर, जि.प. सदस्य शिर्ला सर्कल