अकोला : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे पाणखास नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळल्याने ११ मजूर जखमी झाल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. यापैकी एक मजूर गंभीर जखमी आहे. जखमींमध्ये अंदुरा येथील जय चंदनशिव व रोशन धुरंधर यांचा समावेश आहे.बाळापूर तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अंदुरा येथून जवळच असलेल्या पानखास नदीवरील लाखो रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलावर काम करीत असलेल्या अभियंत्याच्या हलगर्जीमुळे नवीनच टाकण्यात येत असलेला स्लॅब ६ नोव्हेंबर रोजी रात्री कोसळला. या स्लॅबखाली सापडल्याने ११ मजूर जखमी झाले. खामगाव ते अकोट रस्ता रुंदीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून पानखास नदीवरील १ मोरीचा स्लॅब टाकण्यात येत होता. त्यावेळी स्लॅबचे काम पूर्ण होत असताना अचानकपणे हा स्लॅब कोसळला. या स्लॅबखाली दबल्याने ११ मजूर जखमी झाले असून, त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. या सर्व जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.फोटो आहे