अकोला : ब्रिटीश कॉन्सील या शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाNया इंग्लडच्या ऑर्गनायझेशन तर्फे दरवर्षी काही निवडक शाळांना आय.एस.ए. म्हणजेच ‘इंटरनॅशनल स्कूल अवार्ड’ ने सन्मानित केल्या जाते. यावर्षी प्रभात किड्स स्कूल, अकोला या शाळेची निवड या सन्मानासाठी करण्यात आली आहे. वर्षभर ब्रिटीश कॉन्सीलच्या विविध शिक्षणविषयक उपक्रमांची गुणवत्तापूर्ण व यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल आणि त्याचे योग्य सादरीकरण केल्याबद्दल निवड समितीने ही निवड केली आहे.नुकताच नवी दिल्ली येथील ब्रिटीश हाय कमिशनच्या कार्यालयातील सभागृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात देशातील १५४ शाळांना ह्या अवार्डने सन्मानित करण्यात आले. ब्रिटीश कॉन्सील चे चिफ एक्झिकेटीव्ह सर कायरन देवन्, ब्रिटीश कॉन्सीलच्या एज्युकेशन आणि सोसायटीचे डायरेक्टर रिचर्ड एव्हरीट यांच्या हस्ते हे अवार्डस् देण्यात आलेत. प्रभात किड्स स्कूलच्या वतीने संचालक डॉ. गजानन नारे व सौ. वंदना नारे यांनी हा सन्मान स्विकारला. हा अवार्ड २०१७ ते २०२० या तीन वर्षांसाठी मिळाला असून ह्या तीन वर्षांत ब्रिटीश कॉन्सीलच्या सर्व शिक्षण विषयक उपक्रमांचा प्रभात किड्स स्कूल एक भाग असणार आहे. या अवार्डमुळे प्रभातच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. प्रभातच्या प्राचार्य कांचन पटोकार यांनी या पुरस्कारासाठी सर्व उपक्रमांमध्ये गाईड लिडर म्हणून कार्य केले तर डॉ. प्रदीप अवचार यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. ब्रिटीश कॉन्सीलच्या वेळोवेळी झालेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी इंग्रजी शिक्षिका वृषाली पाटील, भाग्यश्री कावळे, माधुरी इंगळे, रुपाली राऊत, अनुजा साहू, कोमल चौरसीया व ग्राफीक डिझायनर अजय मते यांनी विशेष परिश्रम घेतलेत. ह्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि गुणवत्तेसाठी दिल्या जाणाNया पुरस्कारामुळे प्रभात किड्स स्कूल ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. ‘ब्रिटीश कॉन्सील सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेव्दारे शाळेला इंटरनॅशनल स्कूल अवार्ड मिळणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे व ‘टिम प्रभात’च्या अविरत प्रयत्नांमुळेच हे होऊ शकलं. आम्ही ही गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा आणि आणखी वाढविण्याचा प्रयत्न करु’, अशी प्रतिक्रिया प्रभातच्या प्राचार्य कांचन पटोकार यांनी शाळेला अवार्ड प्राप्त झाल्यावर व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय अवार्ड बद्दल प्रभात परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ब्रिटीश कॉन्सीलच्या ‘इंटरनॅशनल स्कूल अवार्ड’ने अकोल्यातील प्रभात किड्स स्कूल सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 6:39 PM
अकोला : ब्रिटीश कॉन्सील या शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाNया इंग्लडच्या ऑर्गनायझेशन तर्फे दरवर्षी काही निवडक शाळांना आय.एस.ए. म्हणजेच ‘इंटरनॅशनल स्कूल अवार्ड’ ने सन्मानित केल्या जाते. यावर्षी प्रभात किड्स स्कूल, अकोला या शाळेची निवड या सन्मानासाठी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देशिक्षणविषयक उपक्रमांची गुणवत्तापूर्ण व यशस्वी अंमलबजावणी आणि योग्य सादरीकरण केल्याबद्दल ही निवड केली आहे.नवी दिल्ली येथील दिमाखदार सोहळ्यात देशातील १५४ शाळांना ह्या अवार्डने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे प्रभात किड्स स्कूल ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.