अकोला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एमपी बीअरबार फाेडून अज्ञात चोरट्यानी महागड्या ब्रँडची सुमारे दाेन लाख रुपयांची दारू पळविल्याची घटना समाेर आली आहे. याप्रकरणी जुने शहर पाेलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपी बीअर व बार रेस्टॉरंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लाेखंड वाकवून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट गोदामाकडे माेर्चा वळविला. चोरट्यांनी गोदामाचे कुलूप फाेडून त्यातील महागड्या ब्रँडचे विदेशी दारूचे बॉक्स चोरी केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
खिडकीला नव्हते ग्रील
एमपी बार अँड रेस्टॉरंटच्या खिडकीला लोखंडी ग्रील नसल्याने चोरटे काचेचा दरवाजा उघडून सहज आत गेले. चोरी केल्यानंतर ते त्यामधूनच सुरक्षित बाहेर आले. चोरट्याना आत प्रवेश करण्यासाठी कुठलाही दरवाजा किंवा खिडकी फोडण्याची गरजच पडली नाही.