या रस्त्याच्या कामामुळे सुरुवातीला अनेकवेळा गावात जाणारी पाईपलाईन फुटली होती. तेव्हा वाडेगावामध्ये आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा बंद होता. आता रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून ठेवल्या असून, त्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. परिणामी अनेकांना याचा त्रास होत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडली असून, ते सर्व तोडलेले ओंडके, लाकडे खाली पडून असल्याने येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी शालेय विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. वाडेगाव रस्त्यालगत ७० ते ८० झाडे रोड वर कापलेले आहेत. एका महिन्यापासून तोडलेल्या वृक्षांची ओंडके रस्त्यावर पडून आहेत. त्यामुळे वाडेगाव येथील नागरिकांना व व्यावसायिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वाडेगाव येथील रस्त्याच्या दोन्ही बाजू तीन फूट खोल व १५ फूूट रुंद व दोन किमी लांब काम बंद पडले आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी शालेय विद्यार्थी जान्हवी राजेंद्र घाटोळ, माधवी गोपाल घाटोळ, कृष्णाली मधुकर जढाळ, तन्वी सुनील घाटोळ, श्रीजित राजेंद्र घाटोळ, अमोल गोपाल मसने, स्वराज मधुकर जढाळ, वेदांत गजानन जढाळ, गोविंदा संतोष फुलबिकर, आदींनी केली आहे.
फोटो :