अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मशीदजवळ साेमवारी रात्री उशिरा एका युवकावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर युवकावर सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आराेपीस खदान पाेलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीस चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली.
खदान परिसरातील बेगम मंजीलनजीकचे रहिवासी असलेले शेख हुसेन शेख बशीर यांच्यावर आराेपी इर्शाद खान याने साेमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास किरकाेळ कारणावरून झालेल्या वादानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यामध्ये शेख हुसेन शेख बशीर गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शेख हुसेन यांचा साेमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आराेपी इर्शाद खान फरार झाला हाेता; मात्र खदान पाेलिसांनी आराेपीस मंगळवारी पहाटे अटक केली. या प्रकरणी खदान पाेलीस ठाण्यात आराेपीविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कसून चाैकशी करून आराेपीस न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. या घटनेची माहिती मिळताच शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी पथकासह धाव घेऊन पंचनामा केला. तसेच आराेपीचा तातडीने शाेध घेण्याच्या सूचना कदम यांनी पाेलिसांना केल्या. त्यानंतर खदानचे ठाणेदार खंडेराव व त्यांच्या पकथकाने आराेपीस अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पाेलीस करीत आहेत.