- संजय खांडेकरअकोला : अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांसाठी आॅल युनियन अॅण्ड असोसिएट आॅफ बीएसएनएल, राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहे. देशभरातील पावणेदोन लाख अधिकारी-कर्मचारी आगामी आठ दिवसांत आंदोलनाचे शस्त्र उपसणार असल्याचे संकेत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनी २००३ पासून देशातील गावपातळीवर कायमस्वरूपी सेवा देत आहे. सरकारच्या ध्येय-धोरणानुसार बीएसएनएलचे कामकाज सुरू असल्यामुळे आणि खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत व्यावसायिक स्पर्धेत टिकू शकली नाही. रिलायन्स जिओ इन्फोटेक कंपनीला शासनाने भरभरून मदत केल्याने बीएसएनएल कंपनी मागे पडली आहे. त्यामुळे २००७ पासून ४ हजार ६०० कोटींच्या तोट्यातून कंपनी अजूनही बाहेर पडली नाही. त्यामुळे सरकारने कंपनीतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची नोकर भरतीदेखील बंद केली आहे. भविष्यात बीएसएनएल कंपनी गुंडाळण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आॅल इंडिया अॅण्ड असोसिएट आॅफ बीएसएनएलच्या अधिकारी-कर्मचाºयांनी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.३ डिसेंबर १८ रोजी राष्ट्रव्यापी आंदोलन छेडले जाणार होते; मात्र वरिष्ठांनी आश्वासन दिल्याने आंदोलन पुढे ढकलले गेले आहे. १० डिसेंबर २०१८ नंतर कधीही आंदोलन सुरू होऊ शकते, असे निर्देश राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिले आहे.-अभिमन्यू चैताने, जिल्हा सचिव, बीएसएनएल अकोला-वाशिम.