- राजरत्न सिरसाट
अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे प्रंचड नुकसान होत असून, विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला.या अस्मानी, सुल्तानी संकटाचा सामना करताना, शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या प्रंचड खचला आहे.राज्यात यावर्षी ४१ लाख हेक्टर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, विदर्भात १६ लाख ४५ हजार ६०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. मराठवाडा १६ लाख ९२ हजार ४१६, खान्देश ७ लाख ८८ हजार १५, तर पश्चिम महाराष्ट्रात २३ हजार ११८ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी राज्यात १० टक्के कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कपाशीचे पीकही जोरदर आले पण अळ््याने आक्रमण केल्याने हे पीक हातात किती पडते, हा प्रश्न आहे.विदर्भात मान्सूनपूर्व कपाशी पेरणी केली जाते. या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पात्या आणि फुले गळती होवून कपाशीचे नुकसान झाले. आता या अळीने नियमित खरीप हंगामातील कपाशी पिकांवर आक्रमण केले असून, अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याने शेकडो शेतकºयांनी या पिकांवर नागर फिरवला.या अळीच्या आक्रमणामुळे ठिकाणी कपाशीची फुले अर्धवट उमलली असून, गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच डोमकळी म्हटले जाते. कपाशीची बोंडे धरायला आल्यापासूनच या अळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये झाला. शेतकºयांनी सर्वप्रकारची किटकनाशके वापरू न नियंत्रण मिळवायचे प्रयत्न केले पण प्रादुर्भाव अधिक असल्याने शेतकºयांनी शेवटी या अळीपुढे हार पत्करली.
कपाशीची प्रत घसरली !बोंडामध्ये ही अळी एकदा शिरल्यास बोंडावरील छिद्र बंद होतात. त्यामुळे बोंडाचे वरू न निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही; परंतु हिरवी बोंडअळी फोडून बघितल्यास, प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे प्रतिकूल परिणाम होऊन कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ््या रुईमधून छिद्र करू न सरकी फस्त करते. त्यामुळे कापसाच्सा रुईची प्रत व सरकीतील तेलाचे प्रमाण खालवते. तसेच बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
बीटीत बोंडअळी प्रतिबंधक जीनबीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीला प्रतिबंधक तंत्रज्ञान टाकलेले आहे.त्यामुळेच शेतकरी बीटी कपाशीची पेरणी करतात, तथापि मागील सात- आठ वर्षापासून बोंड अळ््यांची प्रतिकारक्षमता वाढल्याचे बघावयास मिळत असून, शेतकरीही त्यामुळे हतबल झाला आहे.-नियमित खरीप हंगामातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, या किडींचा बंदोबस्त एकीकृत व्यवस्थापन ,कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करण्याची गरज आहे. - डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख, किटकशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.