सचिन राऊत, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ४ - शेतक-यांना योग्य दर मिळावेत याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातीवंत निरोगी बोकडांचा स्वंतत्र बाजार भरविण्यात आला आहे. ३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या बाजारात १०० च्यावर बोकड खेरदी विक्रीचे व्यवहार झाले. कोणतीही शासकीय मदत न घेता स्थातकोत्तर पशूवैद्यक ,पशू विज्ञान संस्था व जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्यावतीने ३ ते १० सप्टेंबरपर्यंत बोकड प्रदर्शन व विक्री बाजार सुरू राहील. राज्यातील हा पहिलाच उपक्रम मानल्या जात आहे.
पहिल्याच दिवशी या प्रदर्शनात २८ शेतकºयांनी १२० वर जातिवंत बोकड बाजारात आणले होते, बोकड पाहण्यासाठी नागरिकांची, शेतकºयांची आणि व्यापा-यांची मोठी गर्दी आहे. ४ सप्टेबर रोजी या आकड्यात आणखी भर पडली आहे.शेतीला पूरक पशूपालन,दुग्ध व्यवसाय रकरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. बोकड,शेळी,कुक्कुट पालन हे कमी खर्चाच अधिक उत्पादन देतात.
यासाठीचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. भविष्यातील बोकड,शेळी उत्पादन व्यवसायाचे महत्व आहे त्यादृष्टीने पूश विज्ञान संस्थेने शेतकºयांना प्रशिक्षण देण्यास सुरू वात केली आहे.बोकडांची दलालामार्फत विक्री होत असल्याने उत्पादकांना योग्य दाम मिळत नाहीत, ग्राहकांना जातिवंत व निरोगी बोकड मिळावेत व शेतकरी उत्पादकांनाही योग्य दर मिळावेत हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.
कमी खर्चाच्या या व्यवसायाकडे शेतकरी वळला तरी निश्चितच शेतक-यांच्या आत्महत्या थांबण्यात मदत होईल, या अनुषंगाने शेळी,मेंढी पालन,कुक्कुट पालन प्रशिक्षण देण्यात येत असून,त्यांच्याकडील पशूंना योग्य दर मिळावेत म्हणून विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
- डॉ.हेमंत बिराडे,