बेलुरा येथे नवीन विद्युत रोहित्र बसविले
दिग्रस बु: बेलुरा खु. येथील बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांकरिता प्रलंबित असलेला विद्युत रोहित्राची समस्या आमदार नितीन देशमुख यांनी निकाली काढली. उपकार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क करून नवीन विद्युत रोहित्र बसविल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सरपंच धम्मपाल इंगळे यांनीही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
शेतकरी पेरणीपूर्वी मार्गदर्शनपासून वंचित
दिग्रस बु: पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील शेतकरी मागील कित्येक दिवसांपासून शेतकरी वर्ग पेरणीपूर्वी मार्गदर्शनापासून वंचित असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. जवळपास मे महिना संपत आला आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना योग्य असे कृषी विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही. अकोट उपविभागात मास्क व सॅनिटायझरचे वितरण
अकोट उपविभागात मास्क व सॅनिटायझरचे वितरण
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड योद्धांना क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कोटा) शाखा अकोटच्या वतीने पोलीस बांधवांना मास्क व सॅनिटायझर वितरण केले. उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे शाखा अधिकारी विकास अतकरे, उपशाखा अधिकारी राहुल ठाकरे, एरिया अधिकारी पंकज बागडे, भागवत वाघ, अविनाश इंगळे, पवन मंदार, अनिस तडवी, दानिश खान, सिद्धार्थ इंगळे, जयदीप वाळके, सागर काळे, अजय शेलार, रोशन काबे उपस्थित होते.
पंडित नेहरू यांना अभिवादन
मूर्तिजापूर : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनी तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रतिमेला हारार्पण करण्यात आले .यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी बाळासाहेब बाजड, तालुका उपाध्यक्ष डॉ. विजय वानखडे, कार्याध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी रोहित सोळंके, युवक काँग्रेस अध्यक्ष मो. शहाबुद्दीन, शहर कामगार अध्यक्ष दीपक खंडारे, अमोल तातूरकर, सुनील वानखडे उपस्थित होते.
फोटो:
सफाई कामगारांचा मानधन द्यावे
मूर्तिजापूर : येथील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून नगर परिषदेच्या सफाई कामगारांना फ्रंट वर्कर म्हणून सन्मान करून त्यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी अ.भा.स. मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष राजू किसन मिलांदे यांनी केली आहे. सफाई कामगारांच्या कार्याची प्रशासनाने दखल घेऊन त्यांना फ्रंट वर्कर म्हणून सन्मान द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.