-वसंत बाछुका, उद्याेजक
केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे केले तेच कायदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने २००६ लाच केले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली असून , सर्वच क्षेत्रात राज्य सरकार अपयशी झाले असून सरकार ठोस निर्णय घेऊ शकत नाही हे या अर्थसंकल्पात अधोरेखित झाले आहे.
-प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर
राज्य उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
काेराेनाच्या प्रचंड संकटात राज्याचा आर्थिक गाडा चांगल्या पद्धतीने हाकण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब उमटले असून सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर झालेला आहे. १२ व्या वर्गापर्यंत मुलींना माेफत प्रवासाची घाेषणा, महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत असे चांगले निर्णय आहेत.
डाॅ. सुधीर ढाेणे, प्रवक्ता, प्रदेश काँग्रेस कमिटी