- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप पिकांसाठी युरिया खताची मागणी वाढल्याच्या पृष्ठभूमीवर, खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला (एमएआयडीसी) देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा ‘बफर स्टॉक’ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.खरीप पेरणीनंतर उगवलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून युरिया खताच्या मागणीत वाढ झाली आहे; मात्र मागणीच्या तुलनेत अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात विविध ठिकाणी कृषी निविष्ठा केंद्रांमधून शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंंडळाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दोन हजार मेट्रिक टन ‘युरिया’खताचा संरक्षित साठा उपलब्ध करण्याची कार्यवाही कृषी विभाग व ‘एमएआयडीसी’मार्फत सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात २ हजार मेट्रिक टन युरिया संरक्षित साठा उपलब्ध करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात युरिया खताचा संरक्षित साठा उपलब्ध करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.- डॉ. मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.
२ हजार मेट्रिक टन ‘युरिया’चा करणार ‘बफर स्टॉक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 4:43 PM