लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एक छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे आहे. एका छायाचित्रातून अख्खी बातमी, घटना व्यक्त होते. एक छायाचित्र हे एका बातमीचं मूल्यांकन करते. एवढी ताकद छायाचित्रामध्ये असते. छायाचित्रांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणार्या, मनाला प्रसन्नता प्रदान करणार्या छायाचित्रकारांच्या कलेला वाव मिळवून देण्यासाठी, त्यांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी शहरात छायाचित्र कला दालन उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फे खंडेलवाल भवनातील तीन दिवसीय राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व छायाचित्र प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.पाटील होते. यावेळी पाहुणे म्हणून मनपा आयुक्त अजय लहाने, उ पविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश सचिव अँड.सुधाकर खुमकर, नागपूरच्या महिला छायाचित्रकार संगीता महाजन, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल माहोरे, महासचिव जावेद जकारिया, फोटोग्राफर असो.चे अध्यक्ष अरविंद मानकर, सचिव किशोर पिंपळे, असोसिएशनचे कोषाध्यक्ष मोहन सराग, प्रकल्प प्रमुख जगदीश झुनझुनवाला, संजय आगाशे, कृष्णा चव्हाण आदी होते.यावेळी व्यावसायिक गटात प्रथम पुरस्कार चंद्रपूरचे छायाचित्रकार राहुल चिंलगीलवार यांना, द्वितीय गडचिरोली येथील राजेश चिंचगरे, तृतीय अमरावती येथील मीनाक्षी राजपूत यांना मिळाला असून, उत्तेजनार्थ पुरस्कार रोहित बेलसरे (चंद्रपूर), राहुल तेलरांधे (वर्धा), जळगाव जामोदचे अश्विन राजपूत यांना देण्यात आला. हौशी गटात कपिल हिरुळकर (अमरावती), शशिकांत शिरभाते अकोला, शुभम खैरे, मलकापूर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान केला. उत्तेजनार्थ पुरस्कार पुरुषोत्तम ढोले पाटील अकोला, विलास पवार अमरावती, अनुराग अभंग यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत छायाचित्रकार विजय देशमुख, यशवंत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी दिवंगत विजय देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला हिंमत कावरे, प्रमोद भटुरकर, गणेश खेते, सुचित देशमुख, राहुल गोटे, गणेश मावळे, गजानन अनपट, किशोर काळे, विनय टोले, प्रवीण ठाकरे, अता कुरेशी, अजय जागीरदार, माधव देशमुख, मुकुंद देशमुख, विजय मोहरील, नचिकेत जोशी, चेतन देशमुख, सुहास सराग, अजय आगाशे, दिनेश आगाशे, प्रवीण हुरपडे, पडघन यांच्यासह फोटोग्राफर असोसिएशन व बहुजन पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
छायाचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:31 AM
अकोला : एक छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे आहे. एका छायाचित्रातून अख्खी बातमी, घटना व्यक्त होते. एक छायाचित्र हे एका बातमीचं मूल्यांकन करते. एवढी ताकद छायाचित्रामध्ये असते. छायाचित्रांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणार्या, मनाला प्रसन्नता प्रदान करणार्या छायाचित्रकारांच्या कलेला वाव मिळवून देण्यासाठी, त्यांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी शहरात छायाचित्र कला दालन उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.
ठळक मुद्देपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आश्वासनछायाचित्र प्रदर्शनाचा शानदार समारोप