अकोला : कोरोना संकटामुळे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहे. बांधलेले फ्लॅट विकले जाणार की नाही, अशी त्यांना भीती सतावत आहे. त्यामुळे शासनाने धोरण जाहीर करून दिलासा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
--------------------------------------------------
चालकांना हवी मदत
अकोला : शहरामध्ये मोठ्या संख्येने ॲाटोचालक आहे. मात्र, प्रत्येकांचीच नोंदणी न झाल्यामुळे त्यांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या चालकांनाही शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------
नुकसानीची मदत नाही!
अकोला : जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्राच्या जवळपास पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, या नुकसानीची अद्यापही मदत प्राप्त होऊ शकली नाही. ही मदत देण्याची मागणी होत आहे.
------------------------------------------------------
धोकादायक पुलाला कठडे लावा!
अकोला : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.